ताज्या बातम्या
Trending

ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करणे हा विश्वासघात :- खा.डॉ.प्रशांत पडोळे कडाडले दि.२२ मार्चला भंडारा तर २३ मार्चला जंतर-मंतरवर धरणे आंदोलन;

भंडारा:- केंद्र सरकारने नुकतेच जनगणनेचे राजपत्र प्रसिद्ध केले असून, यामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींचा (ST) उल्लेख असला तरी, ओबीसी (OBC) समाजाला डावलण्यात आले आहे. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसून, हा संपूर्ण ओबीसी समाजावर झालेला मोठा अन्याय आणि विश्वासघात आहे, अशी घणाघाती टीका भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली आहे.

निवडणुकीपुरती घोषणा, नंतर विसर

खासदार डॉ.प्रशांत पडोळे पुढे म्हणाले की, “निवडणुकीपूर्वी ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, प्रत्यक्षात राजपत्र प्रसिद्ध करताना ओबीसी समाजाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. निवडणुकीपुरत्या घोषणा करायच्या आणि नंतर मात्र या विशाल समाजाला वाऱ्यावर सोडायचे, हेच या भाजप सरकारचे धोरण आहे. या अन्यायाविरोधात आता केंद्र सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे.”

  1. आंदोलनाचे रणशिंग: भंडारा ते दिल्लीया  अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि ओबीसींच्या हक्कासाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
  2. दिनांक २२ मार्चला भंडारा येथे मोर्चा तर २३ मार्चला दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील आंदोलन होणार आहे. या आंदोलनात ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समाजावर झालेल्या अन्यायाच्या परिमार्जनासाठी रस्त्यावर उतरावे. असेही भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ.प्रशांत पडोळे यांनी सांगितले.”ओबीसी समाजाच्या हक्काची ही लढाई आहे. जर आता आपण आवाज उठवला नाही, तर भविष्यातील पिढ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन उमेश मोहतुरे यांनी केले आहे. एकजुटीने सरकारच्या ध्येय धोरणा विरोधात मोर्च्यात सहभागी व्हा.

एकीने लढू आणि जिंकू पण, बीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी या सरकारला भाग पाडू…

प्रत्येक समाज बांधवानी 22 मार्च २०२६ ला भंडारा येथे जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आव्हाहन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे, उमेश मोहतुरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *