आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडाजीवनशैलीटॉप न्यूजतंत्रज्ञानताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीयव्यापार
Trending

पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

भंडारा दि.24 गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईबाबत पसरत असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. आज तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांच्या (BPCL, HPCL आणि IOCL) सेल्स ऑफिसरशी (विक्री अधिकारी) सविस्तर चर्चा करण्यात आली असून, पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याची खात्री करण्यात आली आहे.या चर्चे नंतर प्रशासनातर्फे खालील महत्त्वाच्या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

• पुरवठा सुरळीत: तिन्ही तेल कंपन्यांकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून मागणीनुसार पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे (Panic Buying) कोणतेही कारण नाही.

• अफवांवर विश्वास नको: इंधन संपणार असल्याच्या चुकीच्या बातम्या किंवा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपावर विनाकारण गर्दी करू नये.

• साठेबाजीवर कडक कारवाई: इंधन टंचाईचा गैरफायदा घेऊन जर कोणी पेट्रोल-डिझेलची अवैध साठेबाजी करत असेल किंवा चढ्या दराने विक्री करत असेल, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

• नियमित संचलन: सर्व पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहतील आणि ग्राहकांना आवश्यकतेनुसार इंधन उपलब्ध करून दिले जाईल.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी संयम राखावा आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *