ताज्या बातम्या

भंडारा नगर परिषदेच्या वतीने, अग्निशमन दलातील शहीदांना आदरांजली

भंडारा :  सध्या सुरु असलेल्या अग्निशमन सेवा सप्ताहांतर्गत भंडारा अनिशमन नगरपालीकाच्या वतीने अग्निशमन दलातील शहीद जवानांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनाचे औचित्य साधून मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले तसेच नगर अग्निशमन अधिकारी समीर गणविर यांनी अग्निशमन दलातील हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या स्मृतीला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मौन पाळून मानवंदना देण्यात आली. यावेळी भंडारा नगरपालिका अग्निशमन विभागातील जवान आणि कर्मचारी उपस्थीत होते.

दि. १४ एप्रील १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिंग या जहाजावर स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीशी झुंज देतांना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. या घटनेनंतरही अनेक प्रसंगामध्ये अग्निशमनाचे कार्य करताना जवानांना प्राणांची
आहुती घावी लागली. त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी दरवर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार देशभरात दि. १४ से २० एप्रील या कालावधित अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. या अंतर्गत नगरपालीकने अग्निशमन दलातील शहिद जवानांनप्रति श्रद्धांजली वाहुन संवेदना व्यक्त केल्या. जनजागृतीसाठी शहरामध्ये रैली काढण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *