ताज्या बातम्या

महामानवाला अभिवादनाचा मानाचा मुजरा भंडारा उप नगराध्यक्षा चंद्रकला भोपे यांची कृतज्ञ भावना

“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांना सलाम चंद्रकला भोपे यांच्याकडून महामानवाला मानवंदना

भंडारा _भंडारा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शास्त्रीनगर येथील साकेत बुद्धविहार, भगतसिंग वार्ड येथे आयोजित कार्यक्रमात उपनगराध्यक्ष श्रीमती चंद्रकला प्रेमचंद्र बोपे यांनी महामानवास अभिवादन करून मानवंदना दिली. यावेळी त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या संदेशावर विशेष भर दिला. तसेच, संविधान निर्मितीसाठी बाबासाहेबांनी केलेल्या त्यागाची आठवण करून देत, त्यांच्या विचारांवर चालत आपले जीवन घडवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *