आंतरराष्ट्रीयआरोग्यक्रीडाजीवनशैलीटॉप न्यूजताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीयव्यापार
Trending

नागपूर विभागातील 18 व्यक्ती व 3 संस्थांना पुरस्कार प्रदान होणार! सामाजिक न्याय विभागाच्या व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारांचे उद्या मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक काम करीत असलेल्या व्यक्तींना व संस्थांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्कार वितरण सोहळा दि. 25 व 26 मार्च 2026 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, जे भोसले मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई येथे मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्रीमती सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री. संजय शिरसाट, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मा.ना.श्री. माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मा. डॉ.श्री. हर्षवर्धन कांबळे, प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, व मा.श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे इ. मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. यामध्ये नागपूर विभागातील 18 व्यक्ती व 3 संस्थांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यामध्ये नागपूर जिल्ह्यातील सात व्यक्ती श्री. पक्षाभान तुकाराम ढोक, श्री. एकनाथ विश्वनाथ पवार, डॉ. प्रितम भीमराव गेडाम, श्री. चरणदास बन्सी वैरागडे, श्रीमती प्रेमा सुधीर लेकुरवाळे, श्री. गौरव आळणे व एक संस्थेला एकात्मता सामाजिक शिक्षण मंडळ, नागपूर मानेवाडा, श्रमजीवीनगर नागपूर, वर्धा जिल्ह्यातील दोन व्यक्ती श्री. तुकारामदास ऊर्फ तुकाराम शंकरराव घोडे, श्री. संगपाल ऊर्फ निलेश सुगदेव पाटील, भडारा जिल्ह्यातील तीन व्यक्ती श्री. सुर्यभान दशरथ तांडेकर, श्री. भावेश एकनाथ कोटांगले, प्रा. युवराज दयाराम खोब्रागडे व एक संस्था राजीव ग्रामीण विकास बहुउद्दे‍शिय शैक्षणिक संस्था, पाचगाव (वरठी), ता. मोहाडी जि. भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील एक व्यक्ती श्री. संदीप गंगाधर कटकुटवार व एक संस्था संत गजानन महाराज प्रसारक मंडळ, सिंदेवाही, ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर, तर गडचिरोली जिल्ह्यातील पाच व्यक्ती श्री. मनोहर माधवराव हेपट, श्री. केशव रामधन चव्हाण, श्री. सुर्यप्रकाश सरस्वती गजानन गभने, श्री. विजय श्रीरंग शेंडे, श्री. तुळशीराम तुलाराम उंदीरवाडे यांची निवड करण्यात आलेली आहे.

व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या समाजासमोर आदर्श ठरलेल्या व्यक्ती व संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देयाची योजना शासनाने सन 1998-99 वर्षापासून सुरु केलेली आहे. सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23, सन 2023-24 व सन 2024-25 या पाच वर्षाकरीता राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांची निवड शासनाद्वारे करण्यात आलेली आहे.

पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींचे व संस्थांचे प्रसाद कुळकर्णी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *