“अनाथ व लहान मुलांना केले उन्हाळी कपडयांचे व आवश्यक वस्तूंचे वितरण”
प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा चा उपक्रम

भंडारा:– या देशातील प्रत्येक माणसाने समतेचे व बंधुत्वाचे विचार स्विकारावे अश्या समाजसुधारक व महापुरूषांची मागील ३ वर्षांपासून जयंती व पुण्यतिथी प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा च्या वतीने सामाजिक कार्य करून करण्यात येत आहे. याच समाजसेवेला समोर नेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भंडारा शहरातील स्थानीय अनाथ व लहान मुलांच्या “बाल उदय“ (वल्र्ड चिल्ड्रेन वेलफेअर ट्रस्ट, इंडिया) या संस्थेस भेट देत तेथील अनाथ व गरजू अश्या लहान मुलांना उन्हाळी सूती कपडयांचे व आवश्यंक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेतील अनाथ व लहान मुलांशी कार्यकत्र्यांव्दारे हितगुज करण्यात आली. व त्यांच्या दैनंदिन दिनर्चयेबद्द्ल व आहाराविषयी संस्थेतील अधिकारी व्दारे माहिती घेण्यात आली. तसेच, हीे बाल उदय (वल्र्ड चिल्ड्रेन वेलफेअर ट्रस्ट, इंडिया) संस्था अतिशय उत्तम रितीने चालवित असलेल्या तेथील अधिकारी व कर्मचारी यांचा प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आणि, भविष्यातही अश्या प्रकारचे समाजोपयोगी आगळेवेगळे उपक्रम राबविण्याचा प्रहार जनशक्ती पक्षाव्दारे संकल्प करण्यात आला.यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष भंडारा जिल्हा सचिव चारूल रामटेके, प्रहार विघार्थी संघटना भंडारा शहर अध्यक्ष आदेश मेश्राम व भंडारा शहर सचिव साहेबराव साखरकर, तुषार मेंढे, निहार वासनिक, स्वप्निल मेश्राम आणि नैतिक गजघाटे उपस्थित होते.



