आंतरराष्ट्रीयक्रीडाटॉप न्यूजताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीयव्यापार

व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांची बैठक उत्साहात संपन्न पत्रकारांवर होणाऱ्या

पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढा- शशिकांत भोयर

व्हॉइस ऑफ इंडिया भंडारा जिल्हा कार्यकारणी जाहीर

  1. भंडारा : व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने भंडारा जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडिया (यूट्यूब) पत्रकारांची महत्त्वपूर्ण बैठक दि. ११ एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे उत्साहात पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांनी भूषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून काशिनाथ ढोमणे, प्रा. राहुल डोंगरे, विशाल रणदिवे आणि अनिल कारेमोरे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले. या बैठकीत जिल्हाभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याची तयारी दर्शवली. यावेळी भंडारा जिल्ह्यासाठी नव्या जिल्हा कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. तसेच तालुका व शहर स्तरावर कार्यकारिणी गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीदरम्यान पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या पाल्यांसाठी मोफत शिक्षण, पत्रकारांसाठी पेन्शन योजना, बस पास सुविधा तसेच घरकुल योजना यांसारख्या विषयांवर सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटितपणे लढा देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पत्रकारांचे हक्क व सन्मानासाठी व्हॉइस ऑफ मीडिया संघटना कटिबद्ध असून जिल्ह्यात संघटना अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल. बैठकीचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. भविष्यात पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या बैठकीस रोशन खोब्रागडे, दिलीप रेहपाडे, धर्मेंद्र भुते, मदन कमाने, अमृतलाल चरडे, विकास नंदरधने, संतोष शेंडे, विलास केजरकर, अनमोल मेश्राम, उमेश जांगडे, दिलीप बनसोड, अॅड. राहुल बोंबर्डे, मुकेश कुमार मेश्राम, मनोज चीचगरे, राकेश श्यामकुवर, सुधीर गोमासे, हंसराज रामटेके, कमलेश मेश्राम, प्रचीन वलथरे, अनिल रणदिवे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *