आंतरराष्ट्रीयक्रीडाटॉप न्यूजताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीयव्यापार

भगवान हनुमानजी, बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी यांच्या जयघोषात 105 वी जयंती साजरी

भगवान हनुमानजी, बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी यांच्या नामघोषात भव्य मिरवणूक

भंडारा : प.पु.प. एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर यांच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची १०५ वी जयंती दि. ३ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित जयंती सप्ताह उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या उत्सवांतर्गत भंडारा येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी यांच्या जयघोषात सेवकांनी भव्य रॅली काढली. सनाया नगर, केसलवाडा येथे रॅलीची सांगता झाली.

रॅलीनंतर दीपप्रज्वलन करून पूजनीय प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमांचे पालन केल्यास मानवी जीवन सुखी व समाधानकारक होते, तसेच मानव धर्मामुळे समाज निर्व्यसनी व अंधश्रद्धामुक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीपतजी भूरे होते, तर उद्घाटन राजूजी वंजारी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून मा. सुरेश कळंबे (संचालक, नागपूर) उपस्थित होते. याशिवाय प्रभाकर वैरागडे, सुधाकर नंदनकर, शंकर बेलखोडे, जयदेवजी धांडे, इंदूताई वैरागडे, मुक्ताताई रोकडे, शकुंतला कारेमोरे, परसराम बारई, मुकुंदा पाचे, ताराचंद देशमुख, सचिन घनमारे, इंदूताई भूरे, सरूताई वंजारी आदी मान्यवरांची उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *